Success Story: प्रेरणादायी! IIT, IIM नव्हे तर ‘या’ कोर्समुळे मिळाले 1 कोटींचे पॅकेज, काय आहे त्याचा खास फॉर्मूला?

Success Story: घरच्या परिस्थितीची जाण आणि मेहनत केली की सगळं काही शक्य होत हे रुशिल पात्रा याने दाखवून दिले आहे. त्याने थेट अमेरिकेतील रोजलँड न्यूजर्सी येथील कंपनी एडीपीमध्ये काम मिळवल आहे. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान, अलाहाबाद (IIT-A) येथील बीटेक आयटीच्या विद्यार्थ्याला अमेरिकेतील एक कोटींहून अधिक पगाराची नोकरी मिळाली आहे. रुशील पात्रा यांने रोझलँड, न्यू जर्सी येथील एडीपी कंपनीत अॅप्लिकेशन डेव्हलपर म्हणून नोकरी मिळाली आहे.

रुशील सध्या IIT-A मधील बीटेक आयटीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत. त्यांने 2023 मध्ये एडीपी कंपनीमध्ये 10 आठवड्यांच्या इंटर्नशिपमध्ये भाग घेतला होता. त्याच्या कामगिरीमुळे त्याला कंपनीत पूर्णवेळ नोकरीची ऑफर मिळाली.

रुशील म्हणाला की, “एडीपी ही एक आघाडीची कंपनी आहे आणि तिथे काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. इंटर्नशिप दरम्यान मी कंपनीच्या संस्कृती आणि काम करण्याच्या पद्धतींशी परिचित झालो होतो. मला आशा आहे की मी तिथे चांगली कामगिरी करेन.”

रुशील यांने IIT-A मधील क्रिकेट टीममध्ये देखील निवडले गेले आहे. त्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दल वाचायला आवडते आणि समाजासाठी परिणामकारक करायची इच्छा आहे. तो मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग वापरून आरोग्य सेवा उद्योगातील समस्या सोडवण्यावर काम करत आहेत.

एडीपी क्लाउड ही एक क्लाउड आधारित ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट कंपनी आहे. कंपनीला नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्टतेसाठी नावलौकिक आहे. 70 वर्षांहून अधिक अनुभवासह, ADP वर जगभरातील व्यवसायांद्वारे पेरोल, मानव संसाधन व्यवस्थापन, फायदे प्रशासन आणि बरेच काही यामधील कौशल्यासाठी विश्वास ठेवला जातो.

IIT-A चे संचालक प्रोफेसर मुकुल शरद सुतावणे यांनी रुशीलचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सांगितले की, “रुशील हा एक हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी आहे. त्याला जगातील आघाडीच्या कंपनीत नोकरी मिळाल्याचा मला आनंद आहे. मी त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.” रुशीलच्या यशामुळे इतर भारतीय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.