उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महादेव जानकर हे भाजपला पाठींबा देणारे उमेदवार होते. हे जर खडकवासला मतदारसंघात माहिती असतं तर लाखांचा फरक मतांमध्ये पडला असता, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. 2014 मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा फटका खडवासला मतदारसंघातून बसला होता.
तेव्हा सुळे यांनी खडकवासला मतदारसंघांमधून मोठी पिछाडी मिळाली होती. तसेच बारामतीतून आघाडी मिळाली होती, यामुळे विजय झाला असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. महादेव जानकर जर कमळ या चिन्हावर लढले असते तर निवडून आले असते.
असे असताना मात्र मतदारांना आपण आवाहन केलं पाहिजे की काही ठिकाणी घड्याळ काही ठिकाणी धनुष्यबाण आणि कमळ महायुतीत चिन्ह आहे, खडकवासला मतदार हा प्रामुख्याने कमळ चिन्ह पाहतो. आता गांभीर्याने यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवा. महायुतीचा उमेदवार निवडून द्या.
दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कंबर कसली आहे. त्यांचे दौरे सध्या राज्यात सुरू आहेत. ते खडकवासला मतदार संघात आले होते. त्यांनी याठिकाणी बैठका घेतल्या. याठिकाणी सुनेत्रा पवार उमेदवार असतील, हे निश्चित झाले आहे.
आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी त्यांनी खडवासला मतदारसंघात बैठक घेत घड्याळ चिन्हाबाबत चिंता व्यक्त केली. आपण चिन्ह उमेदवार लोकांपर्यंत पोहोचवा असेही अजित पवार यांनी सांगितले आहे. यावेळी चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.
दरम्यान, राज्यात बारामती लोकसभा निवडणुक सर्वांत जास्त महत्वाची आहे. याठिकाणी जोरदार लढत होणार आहे. एकीकडे सुप्रिया सुळे तर दुसरीकडे सुनेत्रा पवार अशी ही लढत जवळपास निश्चित मानली जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.