Sushma andhare : पुणे ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला. यानंतर आता राजकीय वक्तव्य होत आहेत. ललित पाटील हा ससूनमधून पळून गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिवसेना नेते दादा भुसे यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन केला होता, असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा, खरी माहिती समोर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दादा भुसे यांच्या नावाच्या अवतीभोवती संशयाचं धुकं असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
याप्रकरणी दादा भुसे यांना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? गृह खात्याची याप्रकरणाचा खरंच छडा लावण्याची इच्छाशक्ती असेल तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.
याबाबत पुण्यातील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील काही दिवसांपूर्वीच यामध्ये शिंदे शिंदे गटाच्या मंत्र्याचा हात असल्याचे देखील सांगितले होते. यामुळे याची देखील चर्चा झाली होती.
आता थेट नावच समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत आता शिंदे गटाकडून काय उत्तर येणार हे लवकरच समजेल. यामुळे सध्या राजकीय टीका सुरू झाल्या आहेत. दादा भुसे देखील यावर अजून काही बोलले नाहीत.