आॅस्ट्रेलियातील दारूण पराभवानंतर टिम इंडीयाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूची निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या निवृत्तीच्या चर्चेत सध्या एक नाव अधिकृतपणे समोर आले आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचा कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवनने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

विजय हजारे ट्रॉफीत हिमाचल प्रदेशने विजेतेपद मिळवल्यानंतर धवनने सोशल मीडियावरून आपली निवृत्तीची घोषणा केली. ऋषी धवनने म्हटले की, तो आता विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये खेळणार नाही. मात्र, तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे.

३४ वर्षीय धवनला भारतीय संघात फारशा संधी मिळाल्या नाहीत. २०१५ मध्ये एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर, २०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने तीन वनडे सामने खेळले, ज्यात त्याला फक्त १२ धावा करता आल्या आणि एकच विकेट मिळाली.

टी२० क्रिकेटमध्ये धवनने झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव सामना खेळला, ज्यात त्याने एक धाव आणि एक विकेट घेतली. त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीत १३४ सामन्यात २९०६ धावा आणि १८६ विकेट्स आहेत, तर टी२०मध्ये १३५ सामन्यात १७४० धावा आणि ११८ विकेट्स घेतल्या आहेत.

धवनच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एका अष्टपैलू खेळाडूचा मर्यादित षटकांच्या प्रकारातील प्रवास संपुष्टात आला आहे.