भयंकर! नात्यातील मुलीवरच 13 वर्षं बलात्कार, प्रसिद्ध अभिनेत्याला ठोकल्या बेड्या…

बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स केल्याच्या आरोपाखाली अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मनोज राजपूतला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

मनोज राजपूतवर आपल्याच एका जवळच्या नातेवाईकावर लग्नाचे आश्वासन देत बलात्कार केला आहे. 13 वर्षांपासून बलात्कार करण्यात आल्याचा पीडितेचा दावा आहे. तसेच या पीडितेने धक्कादायक आरोप केले आहेत. त्याने अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवल्याचे तिने म्हटले आहे.

याबाबत पोलीस गुन्हा दाखल केला आहे. यानंतर दुर्ग जिल्ह्याच्या कार्यालयातून त्याला अटक करण्यात आली. पीडित तरुणी 29 वर्षांची आहे. पीडित मुलीने जुन्या भिलाई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याबाबत तिने माहिती दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, मनोज राजपूत 2011 पासून तिला लग्नाचे आमिष दाखवत आहे. सुरुवातीला तिला आपल्या जाळ्यात ओढून भेटन सुरू केलं. नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तो तिच्याशी अनैसर्गिक शारिरीक संबंधही ठेवत होता.

नंतर मात्र तो सतत बलात्कार करत असल्याचे मुलीच्या लक्षात आल्याने मुलीने लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने टाळाटाळ सुरु केली. यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला. व आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत स्टेशन हाऊस अधिकारी राजकुमार बोरझा यांनी माहिती दिली आहे. या तक्रारीच्या आधारे मनोज राजपूतवर बलात्कार, अनैसर्गिक शारिरीक संबंध, धमकावणं आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

पोलिसांनी यामध्ये पॉक्सोचाही समावेश केला आहे. पीडित मुलीचं लैंगिक शोषण करण्यास सुरुवात झाली तेव्हा ती अल्पवयीन होती. पण स्थानिक न्यायालयाने पॉक्सो कलम हटवलं आहे. याबाबत चौकशी केली जात आहे.