अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका तरुण महिला सीईओचा मृत्यू झाला आहे. त्या फोरमस्ट ग्रुपच्या अब्जाधीश सीईओ होत्या. अँजेला यांची कंपनी फोरमस्ट ग्रुप जागतिक ड्राय बल्क शिपिंग उद्योगातील एक मोठे नाव आहे. यामुळे याबाबत तपास सुरू आहे.
याबाबत आधी वाटलं की हा अपघात साधा आहे, पण तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात एका कार अपघातात अँजेला यांचे निधन झाले. अँजेला यांनी त्यांच्या टेस्ला कारमध्ये चुकून रिव्हर्स गियर लावला होता. ते त्यांच्या लक्षात आलं नाही.
ज्यामुळे तिची कार मागे तलावात पडल्यास तपासात समोर आले. कारमध्ये पाणी भरले आणि कारमधून बाहेर पडू न शकल्याने अँजेला यांचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यूएस सिनेटचे रिपब्लिकन नेते मिच मॅककोनेल यांच्या अँजेला मेहुणी होत्या.
दरम्यान, या अपघातात अँजेला टेस्ला चालवत होती ज्याच्या खिडकीच्या काचा मजबूत होती. टेस्ला कारची हीच गुणवत्ता अँजेलासाठी शाप ठरली. आपत्कालीन पथक तसेच अग्निशमन विभाग तेथे पोहोचले मात्र, अनेक प्रयत्न करूनही खिडकी तोडू शकले नाही. यामुळे त्यांचे निधन झाले.
दरम्यान, अँजेला यांना वाचवायला त्याला सुमारे एक तास लागला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तपास यंत्रणांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणातून तपास करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे तपास थांबवला जाणार आहे.
दरम्यान, कार ड्रायव्हिंग मोडमध्ये ठेवण्याऐवजी त्यांनी रिव्हर्स मोडमध्ये ठेवली. रिव्हर्स मोड चालू करताच कार मागील बाजूच्या तलावात पडली. त्यांना प्रयत्न करून देखील बाहेर पडता आलं नाही. यामध्येच त्यांचे दुःखद निधन झालं. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.