राज्यात शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत. एक गट एकनाथ शिंदेंचा आहे, तर दुसरा गट हा उद्धव ठाकरे यांचा आहे. सध्या एकनाथ शिंदे हे सत्तेत आहे. त्यामुळे अनेक नेते त्यांच्या गटात प्रवेश करत आहे. तसेच ठाकरेंसोबतचे नेतेही शिंदेंसोबत जाताना दिसत आहे.
मनीषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे या नुकत्याच शिंदे गटात गेल्या आहे. असे असताना आता आणखी एक आमदार एकनाथ शिंदेंकडे जाणार असल्याची चर्चा आहे. मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली होती, तेव्हा या आमदाराचे नाव समोर आले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत ठाकरे गटातील रत्नागिरीचे तीन पदाधिकारी होते. त्यांनी आमदार राजन साळवी यांच्याबद्दल तक्रारी केल्या आहे. त्यांच्या निष्ठेबद्दलही त्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.
आमदार राजन साळवी यांची उदय सामंतांसोबत बैठक झाली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्याची चर्चा झाली आहे, असे पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. त्यामुळे राजन साळवी आता शिंदे गटात जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजन साळवी यांचा पीए आणि बॉडीगार्ड हा रिफायनरी एजंट असल्याचे आरोपही करण्यात आले आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ समजले जात होते. पण पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चांमुळे राजन साळवीच्या निष्ठेंसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, उदय सामंत यांनी अमरावती दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यामध्ये बोलताना ते म्हटले आहे की, ठाकरे गटातील ४ आमदार आमच्या संपर्कात आहे. ते लवकरच शिंदे गटात सामील होणार आहे. त्यामुळे राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.