‘तो’ सर्व्हे आला अन् भाजपने शिंदे सेनेच्या ६ खासदारांचा पत्ता कट केला? सर्व्हेमुळे महायुती टेन्शनमध्ये…

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक नेते हे पक्ष देखील बदलत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

यावर्षीची लोकसभा निवडणूक चुरशीची असणार असून भाजपची यादी तयार झाली असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत १३ खासदार आहेत. त्यांना उमेदवारी मिळावी अशी विनंती शिंदेंकडून करण्यात आली आहे. पण यातील ६ खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजप नेतृत्त्व तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.

यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती आहे. यामध्ये ६ खासदारांबद्दल जनतेमध्ये नाराजी असल्याचे भाजपकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे या खासदारांचे टेन्शन वाढले आहे.

त्यासाठी भाजपने सर्वेक्षणांचा हवाला दिला आहे. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी, वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्यासह अन्य दोन खासदारांची नावे यामध्ये आहेत.

तसेच अधिक तिकीटं हवी असल्यास सेनेच्या खासदारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरल्याचंही बोललं जातं. शिंदेंना शाहांचे मन वळवण्याला मोठे यश आल्याचे मानले जात आहे. यामुळे आता शिंदेच्या गटात नाराजी पसरणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.