नशीब म्हणतात ना ते हेच!! एका चहामुळे वाचला 48 जणांचा जीव, घटनेने उडाला थरकाप…

खासगी लक्झरी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. बुलढाण्यामधून ही घटना समोर आली आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आली आहे. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाहीत. चिखली जवळील मेहकर फाटा येथे ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, ही बस वऱ्हाड घेऊन चंद्रपूरवरून बुलढाण्याला निघाली होती. मात्र वाटेतच या बसने पेट घेतला. या बसमध्ये एकूण ४८ प्रवासी होते. बसला अचानक आग लागल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मात्र एका चहामुळे या बसमधील लोकांचे जीव वाचले आहेत.

या घटनेत कोणतीही जिवीतहनी झालेली नाही. जेव्हा बसला आग लागली तेव्हा या बसमधील सर्व प्रवासी हे चहा पिण्यासाठी खाली उतरले होते. बस उभी असताना बसने अचानक पेट घेतला. मात्र एकही प्रवासी बसमध्ये नसल्याने मोठी दुर्घटना टळली. जर चहा घेण्यासाठी सगळे उतरले नसते तर आज परिस्थिती धक्कादायक झाली असती.

असे असले तर मात्र दुसरीकडे प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे. ही बस वऱ्हाड घेऊन चंद्रपूरवरून बुलढाण्याकडे निघाली होती. मात्र वाटेतच मेहकर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. बसने कशामुळे पेट घेतला याबाबत अजून माहिती समोर आली नाही.

प्रवासी चहा पिण्यासाठी उतरले असताना बसनं अचानक पेट घेतला. या घटनेत प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.

परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बस संपूर्णपणे जळून खाक झाली. सर्व प्रवाशांसमोर ही आग लागल्याने प्रवासी घाबरले होते. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील याठिकाणी आले होते. याबाबत तपास सुरू आहे.