Crime News : बाप लेकीच्या नात्याला काळीमा ; मुलगी झोपेत असताना वडीलाने केलं भयानक कृत्य, पुढे जे झालं ते ऐकून तुम्हीही हादराल

Crime News : मुलगी म्हणजे वडिलांचे शरीरा बाहेरचे बोलते ह्रदय समजले जाते. याच नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी स्वतःच्याच मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील ही घटना आहे. नरधाम बापाने स्वतःच्या बारा वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केले. त्यामुळे ती मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या नरधाम बापाने, तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून वारंवार अत्याचार केले. पीडित मुलीची आई झोपेत असताना, नर धाम बाप मुलीवर अत्याचार करत असायचा. त्यामुळे ती मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली.

मुलगी गरोदर असल्याचे लक्षात आले असता, तिच्या आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर वडील गेल्या दोन वर्षांपासून वारंवार अत्याचार करत असल्याची अत्यंत संतापजनक बाब उघडकीस आली.

पीडित मुलीच्या आईने तातडीने दहिवडी पोलीस ठाण्यात धाव घेत, नरधाम नवऱ्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित मुलीच्या बापाला अटक केली आहे. न्यायालयाने नर धाम बापाला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.