विधानसभेला होणार धुराळा!! उद्धव ठाकरे गटात आनंदी आनंद, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अनेक मोठे धक्के देत एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्ह मिळवले होते. असे असताना लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांनी मोठी मुसंडी मारत खरी शिवसेना आपलीच असल्याचे दाखवून दिले. असे असताना आता ठाकरे गटासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिमतीने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊन जनतेच्या मतरुपी आशीर्वादाच्या बळावर घवघवीत यश मिळविले.

असे असताना आर्थिक रसदही तितकीच महत्त्वाची असते. पक्षचिन्ह आणि नाव गमावल्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजिबातच न मिळालेली आर्थिक रसद आता विधानसभेला मिळणार आहे. याबाबत मोठा दिलासा ठाकरे गटाला मिळाला आहे. निवडणूक आयोगाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षनिधी स्वीकारण्यास त्यांना निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांना उद्धव ठाकरे खंबीरपणे सामोरे जाण्यास सज्ज झाले आहेत.

गेल्याच आठवड्यात शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिलेली होती. यामुळे आता महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत जोरदार कामगिरी करण्याच्या तयारीत आहे.
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षनिधी स्वीकारण्यास मान्यता मिळावी, असा अर्ज केला होता.

यावर निवडणूक आयोगाने निर्णय घेत कलम २९ बी नुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देणगी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विधानसभेची तयारी करत असलेल्या उद्धव ठाकरे यांना मोठं बळ मिळालेले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करीत होते. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोरोनासारख्या कठीण परिस्थितीतही दोन वर्ष राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकला. मात्र एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदार घेऊन सरकार पाडले.

त्यांनी भाजपसोबत घरोबा साधून सरकार बनवले. मविआ सरकारमधून बाहेर पडल्याचे बक्षीस म्हणून भाजप नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना थेट राज्याच्या मुख्यमंत्रिपदी काम करण्याची संधी दिली. यामुळे ठाकरे संपणार की काय अशी परिस्थिती असताना त्यांनी लोकसभेला सर्वांना धक्का देत अनेक खासदार निवडून आणले.