प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री साक्षी तन्वरने २००१ मध्ये ‘करम’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर, तिने ‘संसार’, ‘कुटुंब’ आणि ‘धडक’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. मात्र, तिला खरी ओळख ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेमुळे मिळाली.
गेल्या २३ वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या साक्षी तन्वरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज ती आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेतील साक्षी तन्वरच्या सुसंस्कृत सुनेच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले, पण या शोमधील एका सीनमुळे मोठा गोंधळ उडाला.
राम कपूरसोबतचा १७ मिनिटांचा बेडरूम सीन आणि लिपलॉकमुळे ती अचानक चर्चेत आली. या सीनमुळे तिला अनेक टीका सहन करावी लागली. राजस्थानमधील अलवर येथे जन्मलेली साक्षी तन्वरने टीव्ही मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली आहे. मात्र, प्रेक्षक तिला आजही ‘प्रिया शर्मा’ या भूमिकेसाठी ओळखतात.
‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये राम कपूर आणि साक्षी तन्वर यांची जोडी खूप लोकप्रिय ठरली. लोकांनी तिच्या पात्राला खूप पसंती दिली, पण शोमधील किसिंग सीनमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आदर्श सुनेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साक्षीला अशा सीनमुळे प्रेक्षकांकडून टीका करण्यात आली. परिस्थिती इतकी बिकट झाली की, शोच्या निर्मात्या एकता कपूरला या सीनसाठी माफी मागावी लागली.
टीव्ही शो व्यतिरिक्त, साक्षी तनवरचा अभिनय आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातही झळकला. यात ती आमिर खानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचे तर, साक्षी तनवर अजूनही अविवाहित आहे. मात्र, ४५ व्या वर्षी तिने एका मुलीला दत्तक घेतले आणि ती तिचा सांभाळ पोटच्या मुलीसारखा करते.