गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर या चर्चेत आहेत. आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवले आहे. अशातच आता पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यामुळे आता अनेक प्रकरणाची माहिती समोर येणार आहे. रायगडमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. मनोरमा खेडकर यांना पहाटे सहा वाजता महाडमध्ये अटक करण्यात आली. हिरकरणीवाडीमधील पार्वती निवास हॉटेलमध्ये त्यांना बेड्या ठोकल्या.
लॉजवर त्यांनी खोट्या नावाने रूम बुक केली. इंदू ज्ञानदेव ढाकणे नाव सांगत आई आणि मुलासाठी रूम घेतली होती. ड्रायव्हरला त्यांनी आपला मुलगा दाखवलं होतं. पोलिसांनाा त्यांच्या ठिकाणाची खबर लागली, रातोरात त्यांच्या मागावर असलेले पोलीस महाडमध्ये पोहोचले.
दरम्यान, मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते.
आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत. मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती होती. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
महाड मधून पूजा खेडकरच्या आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचे तीन पथक त्या ठिकाणी शोध घेत होते. पूजा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर असल्याची पाहणी केली होती. त्यावेळी तिने पोलिसांना दाद दिली नव्हती.
नंतर घराच्या गेटवरती कुलूप लावल्याचं निर्दशनास आलं होतं. फोन देखील बंद असल्याचं समोर आले होते. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकरला अटक केली आहे. पूजा खेडकर यांच्याबाबत देखील रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांनी आपली पोस्ट मिळवण्यासाठी अनेक बोगस गोष्टी केल्याचे दिसून येत आहे.