नाशिक हादरलं! दोघा भावांना टोळक्याने भर चौकात संपवलं; हत्येमागचं कारण वाचून हादराल

राज्यात गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. त्यामध्ये काही लोकांना तर आपला जीवही गमवावा लागत आहे. अशीच भयानक घटना नाशिकमधून समोर आली आहे. इथे एका टोळीने दोन सख्ख्या भावांवर हल्ला केला आहे.

अंबड-लिंकरोडवर ही घटना घडली आहे. दहा ते बारा तरुणांच्या टोळीने दोन भावांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मेराज खान (१८) आणि इब्राहिम खान (२३) असे त्या दोन भावांची नावे आहे.

रात्री साडेसातच्या सुमारात ही घटना घडली आहे. शिवनेरी चौकात हा सर्वप्रकार घडला आहे. किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यामध्ये मेराजचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इब्राहिमचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ते दोघेही भाऊ संजीवनगर येथील रहिवासी होते. त्यामध्ये एकाचा मासे विक्रीचा व्यवसाय होता. तर दुसऱ्याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. दीड महिन्यापूर्वी लहान मुलांमध्ये वाद झाला होता. याच कारणावरुन हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी रात्री तीन भाऊ शिवनेरी चौकातून जात होते. त्यावेळी त्या तरुणांच्या टोळीने त्यांना अडवले. मिराजला त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी इब्राहिम त्याला वाचवायला गेला असता त्यालाही त्या तरुणांनी मारहाण केली. त्यांच्यावर चाकूने हल्लाही केला. त्यावेळी त्यांचा आणखी एक भाऊही तिथे होता. पण त्याने तिथून पळ काढल्यामुळे तो बचावला.

पोलिसांना त्या भावाने माहिती दिली. त्यानंतर पोलिसही लगेच घटनास्थळी पोहचली. अशात इब्राहिमचे दोन मित्र त्याला घेऊन तातडीने रुग्णालयात गेले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहे.