उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एका महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केला आहे. पतीने त्याच्या दोन मित्रांना तिच्यावर बलात्कार करण्याची परवानगी दिल्याचा खळबळजनक दावा या महिलेने केला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
या महिलेने पोलिसांना सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून तिच्या पतीचे मित्र वारंवार तिच्यावर बलात्कार करत होते. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती एक महिन्याची गरोदर असून तिचा पती सौदी अरेबियामध्ये वाहनांचा मेकॅनिक म्हणून काम करतो. तिने पोलिसांना सांगितले की, तिचा पती तिच्यावर बलात्कार करण्यासाठी मित्रांकडून पैसे घेत होता.
मित्रांच्या पत्नींसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी हे दोघे त्याला पैसे देत होते, असेही तिने सांगितले. पतीला याबाबत सांगितले असता त्याने तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला होता. महिलेच्या आरोपानुसार, तिच्यावर बलात्कार करताना दोन्ही आरोपींनी त्यांच्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले.
नंतर हे व्हिडिओ तिच्या पतीला सौदी अरेबियात पाठवले जात होते. महिलेने सांगितले की, तिचा पती हे व्हिडिओ पाहायचा आणि तिला शांत राहण्यास सांगायचा. पतीने घटस्फोटाची धमकी दिल्यामुळे ती मुलांसाठी शांत राहिली.
पीडितेच्या भावाने सांगितले की, तिने आपल्या पतीसोबत झालेल्या वादानंतर हिंमत करून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अद्याप आरोपी पती आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केलेली नाही, पण प्रकरणाचा तपास सुरू आहे.