प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली होती. २५० कोटींचे कर्ज असल्यामुळे त्यांनी जीवन संपवलं होतं. कर्ज देणाऱ्या कंपनीने त्यांना फसवलं होतं. त्यामुळे तणावात येऊन त्यांनी असे केले होते.
राजकीय नेतेही नितीन देसाईंवर भाष्य करताना दिसून येत आहे. आता शिवसेना गटाचे आमदार उदय सामंत यांनी यावर भाष्य केलं आहे. नितीन देसाईंचं दु:ख काय होतं हे सांगितलं तर रत्नागिरीमध्ये लोकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांवर निशाणा साधला होता.
नितीन देसाई यांनी जीवन संपवण्याच्या एक महिन्यापूर्वी माझी भेट घेतली होती. त्यांच्या सर्वात जवळचा माणूस मी होतो. त्यामुळे त्यांचे दु:ख काय आहे हे मला माहित होते. जर मी ते बाहेर काढलं तर टीका करणाऱ्या लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे म्हणत उदय सामंतांनी म्हटले आहे.
मी तोंड उघडलं तर त्यांची पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी आमच्यावर तोंडसुख घेण्यापेक्षा आपल्या दिव्याखाली अंधार आहे ते पाहावे, असेही उदय सामंतांनी म्हटले आहे. उदय सामंतांच्या या वक्तव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
तसेच नितीन देसाई यांच्या स्टुडिओचं काय होणार हे सांगण्यापेक्षा आणि दुसऱ्यावर टीका करुन बदनामी करण्यापेक्षा त्यांनी त्यांच पद सांभाळावं. शहरचा पाठिंबा कोणाला आहे हे जगजाहीर आहे, असेही उदय सामंतांनी म्हटले आहे.
मला अक्कल नाही असे कुणी समजू नये. पाचही मतदार संघात भगवा फडकणार आहे. जिल्हा परिषदेमध्येही युतीच येणार ही काळ्या दडगावरची पांढरी रेघ आहे. तसेच सगळ्यात अगोदर लोकसभा निवडणूक आहे. तेव्हाच कळेल कुणाची ताकद आहे, असे म्हणत उदय सामंतांनी इशाराही दिला आहे.