राज्याच्या राजकारणात 2019 पासून अनेक घडामोडी घडत आहेत. असे असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या बंडानंतर मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यामुळे राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. फडणवीस एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यामध्ये फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्ही मु्ख्यमंत्री बना असा उद्धव ठाकरेंचा फोन आल्यााचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
असे असताना मात्र वेळ निघून गेली होती. 2022 सालाच्या सत्ता स्थापनेच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री बना असे सांगितले. आम्ही एकनाथ शिंदेसोबत एकत्र येत आहोत हे चित्र जेव्हा स्पष्ट झाले. त्यादिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. त्यावेळी त्यांनी मला सोबत येण्याचे सांगितले.
ते म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेता किंवा त्यांना एखादे पद देता? मी संपूर्ण पार्टी घेऊन येतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. दरम्यान, यावेळी मिलिंद नार्वेकरांनी फोन लावला त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले. मी त्यांना म्हणालो, उद्धवजी वेळ निघून गेली आहे. आता तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा करु शकता.
आता काही होणार नाही. मी म्हणालो, माझ्या पातळीवर हा निर्णय संपलेला आहे. आता जे सोबत आले त्यांच्याशी आम्ही बेईमानी करणार नाही. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला की नाही, या विषयी मला माहिती नाही, असेही फडणवीस म्हणाले. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेले हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.