… तर उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा आमच्या छाताडावर बसेल! भाजप नेत्याने व्यक्त केली भिती

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यातच परभणी लोकसभेची जागा ही भाजपने लढवावी. अन्यथा हा निर्णय चुकला तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमच्या छातीवर बसेल, असा इशारा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे. यामुळे याठिकाणी वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.

याबाबत लोणीकर म्हणाले की, परभणी लोकसभेमध्ये भाजप सक्षम असून भाजप या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतो. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. ही जागा रासपचे महादेव जानकर यांना देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

याठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी बबनराव लोणीकर यांचे पुत्र युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर हे इच्छुक आहेत. यामुळे या जागेसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. परभणी लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाने कमळ या चिन्हावर लढवावी.

असे असताना मात्र याठिकाणी चुकीचा निर्णय झाल्यास ही जागा हातातून जाण्याची भीती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात ३ आमदार, १७ जिल्हा परिषदेचे सदस्य ६५ पंचायत समितीचे सदस्य ९२ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य भाजपचे आहेत.

तसेच २२५० बूथवर भाजपाच्या दोन हजार कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करत संघटन मजबूत झाले आहे. यामुळे आता याठिकाणी काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत.

दरम्यान, परभणी लोकसभा निवडणूक पक्षाने कमळ चिन्हावरच लढणे आवश्यक असल्याचे आमदार लोणीकर यांनी म्हंटले आहे. यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर देखील चर्चा केली आहे. मात्र याबाबत तसा निर्णय झाला नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.