उद्धवजी खरं बोलतायत, अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाच ठरलं होतं! शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेत अमित शाह यांच्यावर टीका केली. अमित शहा खोटं बोलतायत असे सांगितले. तसेच भाजपासोबत युतीत असताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी तुळजाभवानीची शपथ घेतली.

असे असताना यावर शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी घेतलेली शपथ खरी आहे. 2019 मध्ये सुरुवातीची अडीच वर्षे भाजपा मुख्यमंत्रिपद घेणार होती. त्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे असणार होते, अस ठरलं होतं.

यामुळे नंतर भाजपला सोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली होती. त्यानंतर २०१९ साली महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. भाजपाने ऐनवेळी दगा दिला. भाजपचे निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचे ठरले होते.

असे असताना मात्र निवडणूक झाल्यानंतर भाजपाने त्यास नकार दिला. त्यामुळेच आम्ही भाजपाशी असलेली युती तोडली, असा दावा शिवसेनेने केला होता. तर निवडणुकीपूर्वी असा कोणताही करार झाला नव्हता, असे भाजपाकडून सांगितले गेले.

यावरच संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला. भाजपा आणि शिवसेनेकडे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद असेल असे ठरले होते. मात्र उद्धव ठाकरेंनाच भाजपाशी युती करायची नव्हती, असे शिरसाट यांनी सांगितले. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या वक्तव्यामुळे राज्यात चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपने शब्द फिरवला म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात मुख्यमंत्रीपद मिळवले, यामुळे पुढे यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.