दुर्दैवी! आठ वर्षांनी पोटी लेक आली, नियतीने हिरावली, 5 व्या मजल्यावरुन कुत्रा अंगावर पडून चिमुकली दगावली…

सध्या ठाण्यातून एक धक्कादायक घटना घडल्याची समोर आली आहे. यामुळे सगळेच हादरले आहेत. याठिकाणी 3 वर्षांच्या चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरुन कुत्रा पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेने सगळेच हादरले असून घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.

मुब्रामध्ये संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली आहे. मुलगी आईसोबत चालत होती. आई दोन पावलं पुढे असताना अचानक मोठा आवाज झाला. मागे वळून पाहिलं, तर कुत्रा अंगावर पडून मुलगी जखमी झालेली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचे निधन झालं होतं.

यामुळे तिच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर आई लगेच धावतपळ करत असलेल्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलीला मृत घोषित केले आहे. यामुळे तिच्या आईला मोठा धक्का बसला आहे. दुपारी कुत्रा अचानक पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळला.

यावेळी रस्त्यावरुन आईसोबत जाणाऱ्या ३ वर्षांच्या जाणाऱ्या मुलीच्या अंगावर हा कुत्रा पडल्याने तिचा या घटनेत मृत्यू झाला. कुत्रा अंगावर पडताच ही मुलगी बेशुद्ध पडली. यामुळे आई तिला ताबडतोब डॉक्टरांकडे जाते. मात्र तोपर्यंत सगळं काही संपलेलं होतं.

या घटनेत कुत्रा सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. त्याला वेटनरी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरु झाली आहे. मात्र मुलीचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हा कुत्रा अपघाताने खाली पडला की, त्याला जाणीवपूर्वक खाली फेकण्यात आलं, याबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे.

या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. या घटनेत एक निष्पाप तीन वर्षाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिकचा तपास करून पोलीस गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत तपास सुरू आहे.