वळसे पाटील सोडून गेले आणि पवारांनी टाकला हुकमी डाव, होम पिचवरच शिष्य चितपट…

सध्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या नेत्यांपैकी दिलीप वळसे पाटील हे नाव देखील होते. ते शरद पवार यांचे फार जवळचे मानले जात होते.

विश्वासू असले तरी अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांना पाठिंबा दिला. शरद पवारांसाठी हा एक मोठा धक्का होता. असे असताना आता शरद पवार यांनी वळसे पाटील यांना मोठा धक्का दिला आहे.

दिलीप वळसे पाटील यांचे गुरु असणारे शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या होम पिचवरच डाव टाकत त्यांना मोठा धक्का दिला आहे. आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्ती असणारे शेखर पाचुंदकर यांच्यावर शरद पवार यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.

त्यांनी शरद पवार यांची साथ देण्याचे ठरवले आहे. शेखर पाचुंदकर यांच्यावर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी शरद पवार यांनी सोपवली आहे. यामुळे वळसे पाटील यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी शेखर पाचुंदकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी पाचुंदकर यांना नियुक्त पत्र दिले आहे. यामुळे लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांना देखील फायदा होणार आहे. यामुळे आता येणाऱ्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पाचुंदकर हे गेल्या 20 वर्षांपासून दिलीप वळसे पाटील याच्यासोबत एकनिष्ठ होते. मात्र वळसे पाटील यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाचुंदकर यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याठिकाणी शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे.