…म्हणून वसंत मोरे यांनी सोडला पक्ष? खरे कारण आले समोर, अमित ठाकरेंनी…

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राज ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा, अशी पोस्ट त्यांनी कडून आपला राजीनामा दिला आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीवरून वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला असं बोललं जातं आहे. पण आता वसंत मोरे अमित ठाकरे यांच्या बोलण्यावर नाराज असल्याचं समोर आलं आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात पुणे विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला होता.

नंतर वसंत मोरे यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली होती. पण यामुळे अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना झापलं होतं, असेही सांगितले जात आहे. सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा, असेही त्यांना सांगितले होते. त्यामुळे वसंत मोरे नाराज होते. यामुळे अखेर त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, राज ठाकरे 25 वर्षात बोलले नाही ते अमित ठाकरे बोलल्याची सल त्यांच्या मनात होती. दरम्यान, ही पोस्ट अशी होती की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर यशस्वी असा मोर्चा झाला आणि संध्याकाळी अमितसाहेबांचा मला फोन आला होता.

ते म्हणले आजचा मोर्चा खूप छान झाला. तुम्हीही खूप कार्यकर्ते घेऊन आला होता. पण मला तुम्ही दिसला कसे नाही, भेटला केस नाही. मी साहेबांना बोललो, साहेब मी तुमच्या अवतीभवती होतो त्याचा हा पुरावा.

कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल. मी तुमच्या मागे अगदी दोनच पावलं चालतो होतो, असो मी कायमच तुमच्या पाठीमागे असेल, अशी पोस्ट त्यांनी केली होती. यावरच अमित ठाकरे यांनी त्यांना खडसावले असल्याचे सांगितले जाते.

त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करून त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात आपण कोणत्या पक्षात जाणार काय भूमिका घेणार हे देखील सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.