वस्तादाने डाव टाकला! शरद पवारांनी विरोधी पक्षाचा प्रदेशाध्यक्षच फोडला, राजकारणात खळबळ

सध्या आगामी काळात ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आता अनेकजण वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. यामुळे भाजपने जोरदार तयारी केली आहे. लोकसभेत महायुतीमधील अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाला आहे. यामुळे आता तयारी सुरू करण्यात आली आहे.

सध्या शरद पवार देखील कामाला लागले असून अनेकांना पक्षात घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला होता. राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.

त्यानंतर आता पवारांनी आणखी एका पक्षाला मोठा धक्का दिला आहे. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे महायुतीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे.

रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटत प्रवेश केला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. हा रयत क्रांतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भानुदास शिंदे हे गेल्या २५ वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत आहेत.

त्यांनी ऊस आंदोलन, दूध आंदोलन, कर्जमुक्ती आंदोलन अशा विविध आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग आहे. तसेच ऊसदर नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यामुळे शरद पवार विधानसभा निवडणुकीत देखील काय जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.