Virat Kohli : वर्ल्डकपनंतर विराटचा मोठा निर्णय, आता टी-२० आणि वनडे खेळणार नाही, कारणही सांगितले…

Virat Kohli : नुकत्याच झालेल्या विश्वचषक २०२३ मध्ये अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज झाले. असे असताना विराट कोहली सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला होता. विराट कोहलीने २०२३ च्या विश्वचषकात ७६५ धावांसह सर्वाधिक करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

असे असताना आता विश्वचषकानंतर विराट कोहलीने सर्वांनाच धक्का दिला आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. पण, त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे.

विराटने आपल्या निर्णयाची माहिती बीसीसीआयला दिल्याचे वृत्त आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळण्यास नकार दिला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

कोहली पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांती घेईल आणि फक्त कसोटी क्रिकेटसाठी उपस्थित असेल. अशी माहिती समोर आली आहे. या दौऱ्याची सुरुवात १० डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होणार आहे. यामुळे टीममध्ये काही बदल देखील करण्यात आले आहेत.

तसेच १७ डिसेंबरपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. त्यानंतर २६ डिसेंबरपासून टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, कोहलीने बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना सांगितले आहे की, त्याला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांतीची गरज आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात टीम मध्ये अनेक बदल बघायला मिळणार आहेत.