त्यांना मुलीला मुख्यमंत्री करायचंय, शाहांच्या टीकेवर पवार म्हणाले, अमित भाईंना आधी कळायला हवं की…

राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे एकमेकांवर टीका केली जात आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांना त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.

यावर शरद पवार म्हणाले की, शरद माझी मुलगी विधानसभेला नाही, लोकसभेला उभी राहते, हे अमित भाईंना कळलं पाहिजे, अशा शेलक्या शब्दात शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहांचा समाचार घेतला. केवळ दोनच शब्दांत त्यांनी उत्तर दिले आहे.

शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, अमित शाह म्हणाले, सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला पीएम करायचंय, शरद पवारांना त्यांच्या मुलीला सीएम करायचंय. यावर तुमचं काय मत आहे. यावर पवार यांनी माझी मुलगी सुप्रिया सुळे ही विधानसभेला नाही, तर लोकसभेला निवडून आली.

तसेच आताही ती लोकसभेत आहे, हे अमित शाहांना कळलं पाहिजे, असे म्हणत शरद पवार यांनी हसून उत्तर दिले आहे. कोल्हापुरातून शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

तसेच शरद पवार म्हणाले की, मी त्यांची यादी देतो, त्यांच्या पक्षात एका कुटुंबातील दोन दोन लोकांना पदं कशी आहेत? असा प्रश्न देखील तत्यांनी शहा यांनी विचारला आहे. असे म्हणत त्यांनी अमित शहा यांना टोला लगावला. तसेच ते म्हणाले, राज्यात सर्व्हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत.

आमच्या लोकसभेच्या ३९ जागांवर एकमत झाले आहे. शरद पवार यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेऊन त्यांना कोल्हापुरातून महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली, असल्याची देखील माहिती आहे.