शेतकऱ्यांकडून गाड्या गिफ्ट, रोख रक्कम, अर्ज भरण्यासाठी बैलगाडीतून आलेल्या राजू शेट्टींच्या संपत्ती किती? जाणून घ्या…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ते रिंगणार उतरले आहेत. दसरा चौकातून राजू शेट्टी यांनी मोठ शक्ती प्रदर्शन करत पारंपारिक पद्धतीने बैलगाडीमधून व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांनी सोबत एक विद्यार्थी, एक एमआयडीसीमधील कामगार, एक शेतमजूर आणि एक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता असे चौघांना घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे याची चर्चा झाली आहे. यावेळी काहीही करून विजय मिळवायचा, अशी रणनीती त्यांची आहे.

याठिकाणी महायुतीकडून खासदार धैर्यशील माने मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजीत पाटील आहेत. तर वंचित बहुजन आघाडी कडून डी.सी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे त्यांचा विजय इतका सोप्पा नाही.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामधून राजू शेट्टी यांची संपत्ती समोर आली असून गेल्या पाच वर्षात राजू शेट्टी यांच्या संपत्तीमध्ये ४५ लाखांची वाढ झाली आहे, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

यामध्ये राजू शेट्टी यांनी पुण्यामध्ये ३२ लाखांचा एक फ्लॅट खरेदी केला आहे. तर राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांनी तीस लाखांची एक गाडी देखील गिफ्ट दिली असल्याचा प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे. त्यांनी ती खरेदी केली नाही. गेल्या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे राजू शेट्टी यांची मालमत्ता २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ रुपये होती.

आता २०२४ साली मालमत्ता २ कोटी ८१ लाख ३४ हजार ८६६ रुपये एवढी झाली आहे. गेल्या पाच वर्षात राजू शेट्टी यांच्या मालमत्तेमध्ये ४५ लाखांची वाढ झाली आहे. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे 4 जूनला कळेल.