T20 match : रविवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अत्यंत काटेकोर T20 सामना झाला. टीम इंडियाने पराभवाच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 धावांनी अत्यंत रोमहर्षक विजयाची नोंद केली.
या सामन्याच्या शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगने शेवटचे षटक टाकले आणि फक्त 3 धावा दिल्या. सामन्यानंतर अर्शदीप सिंगने शेवटचे षटक टाकण्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला काय सांगितले होते याचा खुलासा केला.
अर्शदीप सिंगने या सामन्याच्या पहिल्या 3 षटकात 37 धावा दिल्या होत्या, परंतु असे असूनही, कर्णधार सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकात गंभीर वळणावर अर्शदीपला गोलंदाजीसाठी निवडले. अर्शदीप सिंगनेही आपल्या कर्णधाराच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही.
अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात केवळ 3 धावा देत सामन्याचे चित्र फिरवले आणि भारताला 6 धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. अर्शदीप सिंगने शेवटचे षटक टाकण्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवने काय सांगितले.
अर्शदीप सिंग म्हणाला, ‘शेवटचे षटक टाकण्यापूर्वी सूर्याने मला सांगितले की, जे होईल ते होईल.’ अर्शदीप सिंगने कबूल केले की त्याला अजूनही खूप काही शिकण्याची गरज आहे आणि तो पुन्हा एकदा मजबूत होईल.
अर्शदीप सिंग म्हणाला, ‘मी पहिल्या तीन षटकांमध्ये खूप धावा दिल्या होत्या, पण मी अजून एका संधीची वाट पाहत होतो. मी शेवटच्या षटकात धावा वाचवल्या ज्यासाठी मी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल टीम इंडिया व्यवस्थापनाचे आभार मानले. टी
म इंडियाने पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 4-1 अशी जिंकली आहे. या सामन्याच्या शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 धावांची गरज होती, मात्र अर्शदीप सिंगने कांगारूंच्या आशा धुळीस मिळवल्या.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर १६१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ आठ विकेट्सवर केवळ 154 धावा करू शकला. अखेरच्या क्षणांमध्ये सामना रोमांचक झाला. शेवटच्या दोन षटकात ऑस्ट्रेलियाला १७ धावांची गरज होती, पण मुकेश आणि अर्शदीपने त्यांचा चांगला बचाव करत भारताला विजय मिळवून दिला.