महाराष्ट्रातील पंढरपूर शहरातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात दगडी शिल्पांचा एक गुप्त कक्ष सापडला आहे. मंदिराच्या आतमध्ये पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. यावेळी गुरुवारी कर्मचाऱ्यांना गुप्त कक्ष दिसला. यामध्ये प्राचीन मूर्ती सापडली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
मंदिर ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, गुप्त गाभाऱ्याचे प्रवेशद्वार दोन बाय दोन फूट असून आतील बाजू पाच बाय पाच फूट आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर शहरातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात दगडी शिल्पांचा एक गुप्त कक्ष सापडला आहे. हे प्राचीन मंदिर परिसराच्या हनुमान मंदिराच्या गेटजवळ आहे. मंदिराच्या आतमध्ये पुनर्बांधणीचे काम सुरू आहे.
यावेळी गुरुवारी कर्मचाऱ्यांना गुप्त कक्ष दिसला. मंदिर ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, गुप्त गाभाऱ्याचे प्रवेशद्वार दोन बाय दोन फूट असून आतील बाजू पाच बाय पाच फूट आहे. ते म्हणाले की, आम्ही विश्वस्त व इतरांच्या उपस्थितीत चेंबर उघडले.
त्यात भगवान विष्णूच्या विविध अवतारांच्या दोन मोठ्या प्राचीन मूर्ती, देवी महिषासुर मर्दिनीची मूर्ती, पाषाणाच्या पायाचे ठसे (पादुका) आणि दोन लहान मूर्ती सापडल्या आहेत. या काळ्या दगडातील मूर्तींशिवाय काही जुनी नाणीही सापडली आहेत.
ते म्हणाले की, आम्ही पुरातत्व तज्ज्ञांना बोलावले आहे. त्यांच्या मुल्यांकनानंतर मूर्ती किती जुन्या आहेत हे कळेल. विठ्ठल मंदिर हे वारकऱ्यांचं सर्वात मोठं देवस्थान आहे. येथे दरवर्षी लाखो लोकं विठ्ठलाच्या भेटीला येत असतात. पंढरपूरची वारी देखील जगभरात चर्चेत असते.
याच मंदिरात दर्शनासाठी लोकं अनेक तास रांगा लावतात. आतापर्यंत यामध्ये विष्णूची मूर्ती, पादुका, एक लहान मूर्ती आणि काही नाणी सापडल्याची माहिती आहे. हे तळघर आणखी किती खोल आहे हे पाहिले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.