उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एक भेट घेतली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकारणात पुन्हा नवीन घडामोडी घडणार अशी चर्चा रंगली आहे.
अजित पवार यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यानंतर शरद पवारांनीही आम्हाला साथ द्यावी असे ते म्हणताना दिसून येत आहे. त्यासाठी अजित पवारांसह त्यांच्या गटाने शरद पवारांची दोन वेळा भेटही घेतली होती. पण भाजपसोबत जाणार नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले होते.
अशात शनिवारी अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यातील एका व्यवसायिकाच्या घरी भेट झाली होती. त्यामध्येही अजित पवार शरद पवारांना उर्वरीत राष्ट्रवादी काँग्रेससह सत्तेत सामील व्हावे असे आवाहन करताना दिसले. पण ही भेटही निष्फळ ठरल्याचे दिसून आले.
अजित पवारांनी तीन वेळा भेट घेऊनही शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. आपण काहीही झालं तरी भाजपसोबत जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच ते भाजपविरुद्धच्या इंडिया आघाडीला मार्गदर्शन करतानाही दिसून येत आहे.
अजित पवार भाजपसोबत हात मिळवणी करत सरकारमध्ये आले आहे. तर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेही लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसून येत आहे. पण राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत नाहीये. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या संपर्कात असून २०२४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर जो काही निकाल येईल त्या बाजूने ते जाणार आहे, अशी चर्चा सध्या भाजप, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांमध्ये होत असल्याचेही म्हटले जात आहे.
शनिवारी अजित पवार आणि शरद पवार हे अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर भेटले होते. त्यांच्यात पाऊणतास चर्चा झाली होती. यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. या भेटीत अजित पवारांनी शरद पवारांसमोर सत्तेत यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं असा प्रस्ताव मांडला होता. पण शरद पवारांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.