दुसऱ्या भेटीत नक्की काय चर्चा? शरद पवार भाजपसोबत जाणार? आतली बातमी आली समोर

अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली आहे. रविवारी ते आमदार मंत्र्यांसोबत आले होते, पण आज ते ३० बंडखोर आमदारांसोबत शरद पवारांशी चर्चा करायला आले होते. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

शरद पवारांना या दोन्ही भेटींबाबत पुर्वकल्पना दिली गेलेली नव्हती. आज आमदार थेट चव्हाण सेंटरला पोहचले होते. त्यानंतर शरद पवारांना याबाबत सांगण्यात आले. त्यामुळे ते सिल्वर ओकवरुन चव्हाण सेंटरला रवाना झाले.

आमदारांनी राष्ट्रवादी पक्षाला एकसंघ ठेवण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती शरद पवारांकडे केल्याची माहिती समोर आली आहे. ४५ मिनिटे ही बैठक सुरु होती. आता पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

असे असताना झालेल्या चर्चे विषयीची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या आमदारांनी शरद पवारांना सत्तेत सामील होण्याची विनंती केली आहे. पण शरद पवारांनी याला नकार देत आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपसोबत जायचा प्रश्नच उद्भवत नाही. लोक भेटून म्हणाली तरी आपण आपल्या भूमिकेत बदल करणार नाही. आपल्याला भाजपविरोधात लढायचंय, असे शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला ठणकावून सांगितल्याची माहिती मिळत आहे.

४५ मिनिटे ही बैठक झाली. यावेळी शरद पवारांनी आमदारांशी चर्चा केली. अजित पवारांच्या आमदारांचे म्हणणे असे आहे की, शरद पवारांनी अधिकृतपणे सत्तेत यावे. पण शरद पवारांनी भाजपसोबत येण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.