वडील होण्यासाठी पुरुषांचे योग्य वय किती असावं? ‘या’ वयानंतर थांबते स्पर्मची निर्मिती, जाणून घ्या…

लग्न झाल्यानंतर अनेकदा नवरा बायको हे आपल्या पुढील अपत्याबाबत विचार करू लागतात. असे असताना अनेकजण लग्न झाल्यानंतर देखील अनेक वर्षे मुलं होऊन देत नाहीत. पुरुष कोणत्याही वयात वडील होऊ शकतात का? असाही प्रश्न समोर येतो. मुलं होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकंच स्त्रियांचे वय महत्त्वाचे असते.

याला अनेक कारणे आहेत. वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये स्पर्मची (Sperm) संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते. यामुळे जास्त वय झाले तर अडचणी येतात. वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुलं होऊ शकतात. 

असे असताना नंतर मात्र अडचणी येतात. मुलाला जन्म देण्यासाठी पुरुषांचे वय खूप महत्वाचे आहे. वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांमध्ये बाप (Father) होण्याची शक्यता कमी होऊ लागते. यामुळे याबाबत लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे.

पुरुषांमधील स्पर्मचे उत्पादन कधीच थांबत नाही. असे असले तरी मात्र वयानुसार, स्पर्मचे डीएनए नुकसान होण्याची शक्यता वाढते. याचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

40 वर्षांनंतर वडील बनलेल्या पुरुषांना त्यांच्या मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम विकसित होण्याचा धोका पाचपट आहे. यामुळे हा धोका टाळण्यासाठी लवकर मुलांचा विचार करण्याचा सल्ला दिला जातो.

दरम्यान, तुम्ही वयाच्या 45 वर्षांनंतर मूल होण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधा. अनेक गोष्टी तुमच्या शरीरावर देखील अवलंबून असतात. यामुळे तुम्ही याबाबत विचार करणे आवश्यक आहे. अनेकदा कोणताही विचार न करता मुलं जन्माला घातले तर अडचणी निर्माण होऊ शकतात.