धोरियामधून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. याठिकाणी पुरुष त्याच्या सासरवाडीला गेला होता, तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी रात्री निवांत झोपलेल्या या व्यक्तीवर आधी त्याच्या पत्नीनं उकळते पाणी टाकले आहे.
तसेच या व्यक्तीला सासरच्या मंडळींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी अम्रिता राय या पत्नीला अटक करण्यात आली आहे. पती आशिष रायचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पत्नी अम्रिता होता. यातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
आशिष सासरवाडीमध्ये गेल्यानंतर सासरच्या व्यक्तींनी त्याचा मोबाईल फोन आणि बाईकची चावी ताब्यात घेतली. त्याला बाईकीच चावी देण्यात आली नाही. यामुळे तो तिथेच राहिला. यावेळी थोडा वाद झाला मात्र परत सगळे झोपले. पहाटे मात्र आशिषच्या पत्नीने बाथरुमला जायचे आहे असे सांगून तो झोपलेल्या रुममध्ये प्रवेश केला.
तेव्हा अम्रिताच्या हातात उकळत्या पाण्याचा टोप होता. अम्रिताने हे उकळलेले पाणी आशिषच्या अंगावर फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आशिष मोठ्याने ओरडला. नंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याच्या डोक्यात मोठी दुखापत झाली.
नंतर त्याला मारत मारत गच्चीवरुन नेऊन तिथून खाली धक्का देण्यात आला. यामुळे त्याला मोठी दुखापत झाली आहे. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याबाबत पोलिसांनी कारवाई केली असून सासरच्या मंडळीला अटक करण्यात आली असून याबाबत तपास सुरू आहे. या घटनेमुळे मात्र सगळेच हादरले आहेत. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.