Karnataka : ऑफिसमध्ये काम करणाऱ्या पुरुषाचा मोबाईल पाहून महिलेला फुटला घाम, जाणून घ्या काय होतं त्यात…

Karnataka : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील एका बीपीओ फर्ममध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय महिलेने तिच्या पुरुष सहकाऱ्याचा मोबाईल फोन गुप्तपणे तपासला. महिलेने फोनच्या गॅलरीत असे काही पाहिले की तिला धक्काच बसला. हातापायांचा थरकाप झाला.

तिच्या सहकाऱ्याच्या फोनमध्ये अनेक महिलांचे 13,000 न्यूड फोटो असल्याचे पाहून महिलेला आश्चर्य वाटले. त्या महिलेचे नग्न फोटोही होते. यासोबतच एकाच कार्यालयात काम करणाऱ्या अनेक महिलांचे नग्न फोटोही समोर आले होते.

महिलेचे त्या सहकाऱ्यासोबत काही काळ संबंध होते. आपल्या सहकाऱ्याच्या फोनवर कार्यालयातील स्वतःचे आणि इतर महिलांचे नग्न फोटो पाहून ती महिला अस्वस्थ झाली. तिने 20 नोव्हेंबर रोजी वरिष्ठ अधिकार्‍यांना याची माहिती दिली.

यानंतर, बेलांदूर येथील बीपीओ कार्यालयाच्या कायदेशीर प्रमुखाने 23 नोव्हेंबर रोजी सायबर क्राईम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आदित्य संतोष असे आरोपी पुरुष कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्यवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याला कार्यालयातून अटक करण्यात आली. आदित्य आणि त्याचा मोबाईल तपासणाऱ्या महिलेचे चार महिन्यांपासून संबंध होते.

यावेळी त्याने महिलेला न सांगता तिच्यासोबतचे प्रायव्हेट क्षणांचे फोटो काढले होते. आदित्यच्या फोनवर तिचे व्हिडिओ असल्याचा संशय महिलेला होता. रेकॉर्डिंग डिलीट करण्याच्या उद्देशाने तिने शांतपणे आदित्यचा फोन तपासला होता.

स्वत:ची आणि तिच्या सहकाऱ्यांची नग्न छायाचित्रे सापडल्यानंतर तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्याचे ठरवले. मूळ छायाचित्रांशी छेडछाड करून काही छायाचित्रे काढण्यात आल्याचा संशय आहे. इतर महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा विचार करून महिलेने कंपनीच्या कायदेशीर प्रमुखाला तात्काळ पोलिस तक्रार करण्याची विनंती केली.

आरोपीच्या फोनमध्ये सापडलेल्या छायाचित्रांचा तपास पोलीस करत आहेत. या छायाचित्रांचा वापर त्याने ब्लॅकमेलसाठी केला असण्याची शक्यता तपासण्यात येत आहे. यासोबतच आरोपींच्या चॅट आणि फोन कॉल्सचाही तपास सुरू आहे.