Kolhapur news : शरीरसंबंधास नकार दिल्याने महिलेचा खून, नंतर उसाच्या फडाला आग लाऊन केला पुरावा नष्ट; कोल्हापुरातील धक्कादायक घटना…

Kolhapur news : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेला आयुष्यातून उठवले. हा प्रकार उघडकीस येऊ नये उसाचा फड पेटवून दिला आहे. या घटनेने जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

या घटनेत आशाताई मारुती खुळे या विधवा महिलेचा बळी गेला. या महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. ती आईसोबत भादवन येथे राहते. याप्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात योगेश याने सदर महिलेला जबरदस्ती नेले.

याठिकाणी त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आशाताईने विरोध केला. तो तिला शरीरसंबंध ठेव असे सांगत होता. मात्र तिने विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या योगेशने तिचा गळा आवळून खून केला .

नंतर ही घटना कोणाला समजू नये म्हणून त्याने उसाच्या फडाला आग लावली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. याबाबत पोलीस तपास करत आहेत. नंतर आग आटोक्यात आणण्यासाठी योगेशनेच आटापिटा सुरु केला.

तसेच उसाच्या फडातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्याचाच पुढाकार होता. यामुळे याबाबत कोणाच्या लक्षात आले नाही. गावातील कॉन्स्टेबल समीर संभाजी कांबळे यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीमुळे ही घटना समोर आली आहे. आरोपी हा त्याठिकाणी गेला असल्याचे दिसून आले. यामुळे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वांना मोठा धक्का बसला.