खेळ

World Cup Final : असाही चाहता! भारताचा पराभव जिव्हारी, चाहत्याने 60 हजारांचा टीव्ही फोडला, व्हिडिओ व्हायरल…

World Cup Final : देशात काल झालेल्या वर्ल्ड़ कपमध्ये सलग दहा सामने जिंकून फायनल गाठणाऱ्या टीम इंडियाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न ऑस्ट्रेलियाने धुळीस मिळवले. यामुळे चाहते नाराज झाले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला.

भारतच वर्ल्ड कप जिंकणार अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण भारतीय चाहत्यांचे स्वप्न भंगले यानंतर चाहते संताप व्यक्त करतानाही दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात भारताने मॅच गमावताच चाहत्याने घरातला टीव्ही रस्त्यावर नेत फोडला आहे.

भारताच्या पराभवामुळे रागाच्या भरात चिडलेल्या चाहत्याने टीव्ही भिंतीवरून काढला. घराबाहेर नेत टीव्ही जोरात जमिनीवर आपटला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न घरच्यांनी केला, मात्र तो थांबला नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. यामुळे देशातील चाहते नाराज झाले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी वर्चस्व राखले.

यामुळे भारतच हा सामना जिंकेल असे सर्वांना वाटत होते. पण अंतिम फेरीत दोन्ही विभागांमध्ये भारताची कामगिरी निराशाजक राहिली. यामुळे भारताचा पराभव झाला. भारताला प्रथम फलंदाजी करताना केवळ २४१ धावा झाल्या. यामुळे परिस्थिती बिकट झाली.

भारतीय संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच ऑल आऊट झाला. सुरुवातीला तीन विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांना त्यानंतर यश मिळवता आलं नाही. त्यामुळे भारताच्या हातून सामना निसटला. तीन विकेट गेल्यावर भारत हा सामना जिंकेल, असे अनेकांना वाटत होतं, पण निराशा झाली.

Related Articles

Back to top button