रिल्ससाठी वाट्टेल ते!! तरुणीने चक्क दुकानदारासमोरच बदलली पॅन्ट, पहा व्हिडिओ

नवी दिल्लीमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील पालिका बाजारमध्ये एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये एक महिला ग्राहक दुकानाती पुरुष कामगारांसमोरच पॅण्ट बदलताना दिसत आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

हा विडिओ इन्स्टाग्रामवर रिल म्हणून शेअर करण्यासाठी जाणूनबुजून शूट केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. लोकप्रियतेच्या नादात असले काही प्रकार करण्याची महिलांना खरंच गरज आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सार्वजनिक ठिकाणी हे असले अश्लील रील करणे किती योग्य आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. ही आपली संस्कृती नाही, असेही अनेकांनी म्हटले आहे. असले रिल्स शूट करण्यासंदर्भात कठोर नियम केले जावेत, असेही अनेकांनी म्हटले आहे.

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही पद्धतीची लाजलज्जा न बाळगता तरुण, तरुणी वाटेल त्या पद्धतीने रिल्स शूट करतात. अनेकदा त्यांचे कपडे आणि इतर गोष्टी देखील खुपच विचित्र असतात. चेंजिंग रुम उपलब्ध असतानाही तिने दुकानदारासमोरच मुद्दाम पॅण्ट बदलल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ दिल्लीतील पालिका बाजारमधील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र असाच दावा गोव्यासंदर्भातही केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत खात्री नाही.

दरम्यान, पुरुषाने जर असा प्रकार केला असता तर काय झालं असतं असं एका महिलेने विचारलं आहे. तर इतरही अनेक लोकांनी यावर आक्षेप नोंदवले आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागली आहे. यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.