---Advertisement---

आईसोबत फिरत होती मुलगी; अचानक एक तरुण आला, अन…; भयंकर घटनेने ठाण्यात खळबळ

---Advertisement---

ठाण्यातील कल्याण पुर्वेकडील तिसगाव परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आईसोबत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर चाकुने हल्ला करुन तिची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर तो पळून जात होता. पण त्यानंतर तेथील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस आता त्याची चौकशी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ती अल्पवयीन मुलगी तिसगाव परिसरातील दुर्गादर्शन सोसायटीमध्ये राहते. बुधवारी ती आपल्या आईसोबत सोसायटीच्या आवारात आली होती. त्यावेळी अचानक एक अनोळखी तरुण तिथे आला आणि त्याने तिच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यानंतर आई ओरडू लागली. ते पाहून सोसायटीच्या नागरिकांनी धावून त्या आरोपीला पकडले. आदित्य कांबळे असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडे ताब्यात देण्याआधी आरोपीने फिनेल पिले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्या आरोपीला सध्या केडीएससीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.

आदित्य कांबळेने कोणत्या कारणामुळे त्या मुलीची हत्या केली हे अद्यापही समजू शकलेले नाही. पोलिस त्याची चौकशी करुन कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---