कचरा वेचणाऱ्या ११ महिला एका रात्रीत झाल्या करोडपती, सगळ्यांनी मिळून २५-२५ रुपये काढले अन्…

असे म्हणतात नशीबात काय आहे हे कोणालाचं माहिती नसतं. कधी कोणाचं नशीब चमकेल हेही सांगणं तेवढंच कठीण आहे. अनेकांचं एका रात्रीत नशीब चमकतं आणि ते करोडपती होतात, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. आता अशीच एक घटना समोर आली आहे.

कचरा वेचणाऱ्या ११ महिलांसोबत असंच काहीसं झालं आहे. ११ महिलांनी तब्बल १० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. ही घटना केरळमध्ये घडली आहे. त्यामुळे एका झटक्यात या सर्व महिला कोट्यवधी रुपयांच्या मालकीण झाल्या आहेत.

केरळमधील महिला कामगारांनी तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे काढले होते. कारण ते तिकीट २५० रुपयांचे होते. त्यामुळे अर्धे अर्धे पैसे त्या महिलांनी तिकीट घेतले होते. अशात त्यांची लॉटरी लागली आणि एका क्षणात त्यांचं नशीब बदललं आहे.

या ११ महिलांनी लॉटरीचे फर्स्ट प्राईज जिंकले आहे. या सर्व महिला गेल्या काही वर्षांपासून कचरा वेचण्याचे काम करत होत्या. त्या महिला पालिकेतील ५७ सदस्यांच्या एचकेएस गटाचा भाग आहेत. ते हरीत सेनेचे काम करतात.

लॉटरी जिंकल्यानंतरही आपण आपले काम सुरुच ठेवणार असल्याचे त्या महिलांनी म्हटले आहे. कोणत्याच महिलेने एकट्याने ती लॉटरी जिंकली नाही. ती लॉटरी त्यांना सामूहिकरित्या जिंकता आली. त्यामुळे त्यांनी यापुढेही असेच आपले काम सुरु ठेवू असा निर्णय घेतला आहे.

त्या सर्व महिला परप्पानंगडी येथील रहिवासी आहेत. त्यातील एका महिलेने सांगितले की त्यांना कोणतीच आशा नव्हती की ते लॉटरी जिंकतील. कारण त्यांचं ते चौथं लॉटरीचं तिकीट होतं. पण दुपारी घरी गेल्यावर त्यांच्या मुलाने सांगितलं एका व्यक्तीचा फोन आला होता आणि आपण बक्षीस जिंकल्याचे तो सांगत होता. आम्हाला लॉटरी लागल्यामुळे आम्ही खुप आनंदी आहोत.

२५० रुपयांचं तिकीट होते. त्यामध्ये ९ जणींनी प्रत्येकी २५ रुपये जमा केले होते. तर दुसऱ्या दोन महिलांनी १२.५ रुपये जमा केले होते. पी पार्वती, के लीला, एम पी राधा, एम शीजा, के चंद्रीका, ई बिंदू, कार्तियायिनी, के शोभा, सी बेबी, सी कुट्टीमालू आणि पी लक्ष्मी असे त्या महिलांची नावे आहे.