Santosh Deshmukh : ब्रेकींग! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकाऱ्यांची न्यायाधीशांसोबत धुलीवंदन साजरी?

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या आणि निलंबित पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील न्यायाधीशांसोबत होळी साजरी केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी दोन निलंबित पोलीस अधिकारी आणि न्यायाधीशांचा रंगपंचमी खेळतानाचा फोटो ट्विट करत हा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, “देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश … Read more

Satish Bhosale : खोक्या भोसलेचं पाडलेलं घर पेटवलं; जनावरांचा चाराही पेटला, काही जनावरांचा मृत्यू, जीवनावश्यक वस्तू जळाल्या

Satish Bhosale : बीडमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घराला अज्ञातांनी आग लावल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेत घरातील महत्वाच्या वस्तू जळून खाक झाल्या असून, जनावरांचा चारा जळाल्यामुळे काही पशूंचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वनविभागाने केलेली कारवाई आणि त्यानंतर लागलेली आग … Read more

Devendra Fadnavis : केंद्राचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीवारी यशस्वी, पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली – मुंबईत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (I.I.C.T.) उभारण्यात येणार आहे. आयआयटीच्या धर्तीवर हे संस्थान असणार असून, त्यासाठी फिल्म … Read more

Nitesh Rane : जय श्रीराम न बोलल्याने मुस्लिम कुटुंबाला नितेश राणेंच्या समर्थकांकडून मारहाण, राणेंच्या राजीनाम्याची मागणी करत कुटूंब रस्त्यावर

Nitesh Rane : राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने एका मुस्लिम कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण चव्हाट्यावर आले. पीडित कुटुंबाने केली मुख्यमंत्री भेटण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात पीडित आसिफ … Read more

Jejuri temple : खंडोबा शाकाहारी देव, मल्हार सर्टिफीकेटचं नाव बदलावं, नितेश राणेंकडे जेजुरी देवस्थानची मागणी

Jejuri temple : भाजप आमदार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटण विक्रीसाठी “मल्हार सर्टिफिकेट” देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सर्टिफिकेटच्या नावावरून जेजुरीच्या मार्तंड देवस्थानमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. खंडोबाच्या भक्तांकडून नाव बदलण्याची मागणी ही योजना “मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम” या माध्यमातून राबवली जाणार असून, फक्त हिंदू खाटिकांना हे प्रमाणपत्र दिले … Read more

Uddhav Thackeray : रवींद्र धंगेकरांनंतर एकनाथ शिंदेंचा पुण्यात उद्धव ठाकरेंना दणका, ‘फायरब्रँड’ नेत्याचा शिवसेनेते प्रवेश

Uddhav Thackeray : राज्यात सध्या “ऑपरेशन टायगर” जोरात सुरू असल्याच्या चर्चा आहेत. अशातच शिवसेना (शिंदे गट) महाविकास आघाडीतील नेत्यांना आपल्या गोटात खेचण्यात यशस्वी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील फायरब्रँड नेत्या सुलभा उबाळे यांनीही ठाकरे गटाचा निरोप घेत शिंदे … Read more

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या टीममधला महत्वाच्या चेहऱ्याचा भीषण अपघात, जागेवरच झाला मृत्यू

Raj Thackeray : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ रोडवर भीषण अपघात झाला असून, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी (११ मार्च) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पिंपरी लिंबाळा मक्ता भागात घडला. अजिंक्य घुगे हे आपल्या कारने … Read more

Valmik Karad : वाल्मिक कराडने उज्ज्वल निकमांसमोर उभी केली दिग्गज वकीलांची फौज, हिअरींगच्या पहिल्याच दिवशी कोर्टाचा मोठा निर्णय

Valmik Karad : बीड येथील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. सद्यस्थितीत या प्रकरणाची न्यायालयीन, एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू असून, एक आरोपी वगळता सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या … Read more

Jayakumar Gore : ‘त्या’ मंत्र्याचे ३०० नग्न, अश्लील फोटो न्यायालयानेच जनहितार्थ समोर आणावे; शिवसेनेचा हल्लाबोल

Jayakumar Gore : सातारा जिल्ह्यातील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करत हा संपूर्ण प्रकार झुंडशाही आणि सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. पत्रकार तुषार खरात यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांवरूनही राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तुषार खरात यांनी जयकुमार गोरे यांच्यावरील एका … Read more

Devendra Fadnavis : …तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Devendra Fadnavis : मुंबई – राज्यातील मशिदींसह सर्व प्रार्थनास्थळांवरील भोंगे आता पोलिसांच्या परवानगीशिवाय लावता येणार नाहीत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर तसेच संबंधित भागातील पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भोंग्यांसाठी परवानगी बंधनकारक भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या त्रासावर लक्षवेधी मांडली. … Read more