..तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बंद होणार, सरकारची मोठी घोषणा

राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांच्या तक्रारींची छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जातील, असे सांगण्यात आले आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, या योजनेबाबत ते सातत्याने … Read more

लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणार 7000 रुपये,मोदी सरकारने आणली नवी योजना, ‘असा’ करा अर्ज

महिलांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकार सातत्याने नवनवीन योजना राबवत आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आणलेली नवी योजना म्हणजे ‘विमा सखी योजना’. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 9 डिसेंबर रोजी हरियाणाच्या दौऱ्यादरम्यान या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या सरकारी विमा कंपनीकडून ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पुढील … Read more

स्मशानभूमी खोदताना सापडली जुनी मडकी, उघडताच आत दिसला खजिना, मजुरांनी आपसात वाटला, अन् नंतर…

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील कोतवाली देहाट परिसरातील करुंदा चौधर गावात एक अनोखा प्रकार घडला आहे. गावातील स्मशानभूमीच्या स्वच्छतेचे काम सुरू असताना मजुरांना मुघलकालीन चांदीची नाणी सापडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. शनिवारी मनरेगा अंतर्गत स्मशानभूमी स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. गावप्रमुख इकरार अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असताना, स्मशानभूमीच्या पूर्वेकडील भागात मातीचे … Read more

नांदायला येत नव्हती पत्नी, पतीने सासरच्यांसोबत केले असे कृत्य की धावतपळतच पोहचले पोलिस, पुणे हादरले

महाराष्ट्रातील पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे पतीने थेट सासूचे घरच पेटवून दिले. कारणही तसेच धक्कादायक होते. त्याची पत्नी आपल्या माहेरून घरी परतण्यास तयार नव्हती. ही घटना गुरुवारी मध्यरात्री कोथरूड येथील सुतारदरा परिसरात घडली. साहिल नावाच्या व्यक्तीच्या आईने आपला मुलगा दुसऱ्या मुलीसोबत फिरत असल्याचे त्याचा सासूला सांगितल्यावर पती-पत्नीमध्ये मोठे भांडण झाले आणि पत्नी तेजल … Read more

महाविकास आघाडीत बिघाडी; भर सभागृहात आदित्य ठाकरेंना आमदाराने सुनावले खडे बोल

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आणि समाजवादी पक्षामध्ये वाद उफाळल्याचे दिसत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने शपथविधीवर बहिष्कार टाकला होता, मात्र समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि रईस शेख यांनी स्वतंत्र भूमिका घेत शपथ घेतली. यामुळे समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना … Read more

राज्यात मारकडवाडीची चर्चा पण ‘या’ गावात बंदोबस्तात बॅलेट पेपरवर झाले मतदान, मतदारांचा दणदणीत विजय

शहादा तालुक्यातील असलोद गावात महिलांच्या नेतृत्वाखाली अवैध दारू विक्री बंदी आणि बियर बार-शॉपीचे परवाने रद्द करण्यासाठी अनोखी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. “आडवी बाटली” म्हणजे दारूबंदी आणि “उभी बाटली” म्हणजे दारू सुरू ठेवण्याच्या बाजूने मतदान घेण्यात आले. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर “आडवी बाटली” निवडून दारूबंदीच्या बाजूने स्पष्ट मत दिले. असलोद गाव आणि परिसरात अवैध दारू विक्री … Read more

पृथ्वीवरील ‘हा’ देश सर्वात आधी नष्ट होणार; धक्कादायक कारण आले समोर

पृथ्वीच्या भवितव्याबाबत अनेक तर्क-वितर्क केले जात असतानाच, संशोधकांनी दक्षिण कोरिया या देशाच्या अस्तित्वावर गंभीर धोका व्यक्त केला आहे. लोकसंख्या घटण्याच्या वेगामुळे पुढील काही दशकांमध्ये हा देश संपूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण कोरियाला आर्थिक प्रगती आणि आधुनिकतेसाठी ओळखले जाते, परंतु झपाट्याने घटणारा प्रजनन दर आणि वृद्ध लोकसंख्येच्या प्रमाणात होणारी वाढ ही समस्या चिंतेची … Read more

काँग्रेसला धक्का! पराभूत होताच माजी आमदार पक्षाला रामराम ठोकणार? अजितदादांच्या राष्ट्रवादीत इनकमींग

नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, तर पक्षाचे दोन विद्यमान आमदार पराभूत झाले. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. … Read more

क्रिकेटर विनोद कांबळी सध्या कोणाच्या पैशांवर जगतोय? करोडो गमावल्यानंतर ‘असा’ भागवतोय घरखर्च

एकेकाळी भारतीय क्रिकेटमधील चमकता तारा असलेल्या विनोद कांबळीच्या आयुष्याची सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. मैदानावर दमदार कामगिरी करत करोडपती झालेला हा क्रिकेटपटू आता आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याच्याकडे ना संपत्ती उरली, ना कमाईचा कोणताही स्रोत आहे. सध्या त्याचा घरखर्च बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेंशनवर चालतो आहे, तर मित्रांच्या मदतीने त्याच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवला जात आहे. विनोद कांबळीने … Read more

तळेगावातील 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाने केला दावा, शेतकऱ्यांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव, जिथे 150 उंबऱ्यांचे छोटेसे गाव आहे, तेथे 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. या दाव्यानंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाने गावातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटात टाकले आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबादने वक्फ याचिका क्रमांक 17/2024 अन्वये या जमिनींवर दावा केला आहे. या दाव्यानुसार, तळेगावातील … Read more