भंडारामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शक्तीवर्धक गोळ्या घेतल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये संबंधित घटना घडली आहे. तरुणाचे वय हे २३ वर्ष होते. तो मुळचा नागपूरच्या कामठीचा होता. त्याचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जरफडा येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.
२० ऑगस्टला ते दोघेही भंडारामध्ये भेटण्यासाठी आले होते. भेटल्यानंतर त्यांंनी वेगवेगळ्या पर्यटनस्थळी भेट दिल्या. तसेच जेवणाचे सामान आणि बाकीची खरेदी करुन ते शहरातील हिरणवार लॉजवर आले.
हिरणवार लॉजवर शरीरसंबंध बनवण्यासाठी त्याने शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी संबंध बनवले. रात्री दोघेही तिथेच झोपले होते. पण त्यानंतर सकाळी जेव्हा तरुणी झोपेतू उठली, तेव्हा तिने त्या तरुणाला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो उठत नव्हता.
अशात तरुण काहीच हालचाल करत नसल्यामुळे ती खुपच घाबरली. त्यानंतर तिने तातडीने लॉजमधील कर्मचाऱ्यांना आवाज दिला. त्या कर्मचाऱ्यांनी तरुणाला तातडीने एका रुग्णालयामध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी त्याच्या मृत्यूची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून केली आहे. पण त्याच्या शवविच्छेदन अहवालानंतर त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे कळणार आहे. शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.