पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पोलिसांकडे देईल अशी भिती दाखवून एका अल्पवयीन मुलासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील कोंढवा भागात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी एका २७ वर्षीय महिलेच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं आहे. मे २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये त्या महिलेने २ ते ३ वेळा त्या मुलासोबत जबरदस्ती केल्याचे समोर आले आहे.
अल्पवयीन मुलगा आणि संबंधित महिला हे कोंढवा परिसरामध्ये राहतात. ते दोघेही एकमेकांच्या शेजारीच राहतात. आरोपी महिलेच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले होते. त्यामुळे ती खुप एकटी पडली होते.
अशात संबंधित महिलेने एका अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याच्यासोबत शरीरसंबंध बनवले. तसेच त्यानंतर अल्पवयीन मुलाने नकार दिल्यामुळे तुला पोलिस ठाण्यात देईन अशी धमकी ती महिला त्याला देत होती.
त्यामुळे इच्छा नसतानाही त्या अल्पवयीन मुलाला शरीरसंबंध ठेवावे लागले होते. महिलेने त्यावेळी व्हिडिओ सुद्धा काढल्या होत्या. महिलेने दोन तीन वेळा जबरदस्तीने त्याच्यासोबत शरीरसंबंध बनवले होते.
अखेर महिलेच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलाने आपल्या घरी याबाबत सांगितले. तसेच आपले व्हिडिओ त्या महिलेकडे असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे पालकांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही गुन्हा दाखल करुन त्या महिलेला ताब्यात घेतले आहे.