धाराशिवमधील वाशी तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भवती केले आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मुलीला पाच महिन्यांपासून मासिक पाळी आली नसल्यामुळे तिच्या पालकांनी तिला रुग्णालयामध्ये दाखवले होते. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुलीला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी ही इयत्ता ९ वीमध्ये शिकते. ती ज्या रस्त्याने शाळेत जाते, त्या रस्त्यामध्ये स्वानंद गाढवे नावाच्या तरुणाचे मटणाचे दुकान आहे. मुलगी दररोज दुकानासमोरुन जात असल्याने स्वानंदने तिच्याशी ओळख वाढवली होती.
त्यानंतर तिच्याशी मैत्री केली. त्यांच्या या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात रुपांतर झाल्यामुळे तो तरुण तिच्यासोबत जवळी साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर तिची इच्छा नसतानाही तिला घराजवळील एका पडीक जागेजवळ नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
तसेच हे कोणााही सांगू नकोस. जर तु कोणाला सांगितलं तर तुला आणि तुझ्या आईवडिलांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी त्याने त्या अल्पवयीन मुलीला दिली होती. त्यानंतर तो धमकी देऊन वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिला.
वारंवार अत्याचार होत असल्यामुळे मुलगी गर्भवती राहिली होती. मासिक पाळी येत नसल्यामुळे पालकांनी तिला रुग्णालयात नेलं होतं. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत त्या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.