सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. यामध्ये नुकताच महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या एका नव्या चर्चेनं आता राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांनी जास्त जागांची मागणी केली आहे.
या जागा वाटपाच्या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. यामुळे आता जरांगे उभा राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तसेच वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघांमध्ये पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी केली होती, त्याची अंतिम यादी देखील समोर ठेवली आहे. यामध्ये मात्र खूपच जास्त जागा त्यांनी मागितल्या असल्याचे सांगितले जात आहे. वंचित बहुजन आघाडीनं अनेक प्रस्तावही मविआला दिले आहेत.
त्यामुळं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मविआमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने पहिला प्रस्ताव हा मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून आणि डॉ. अभिजित वैद्य यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा आहे. हा सर्वात महत्वाचा प्रस्ताव आहे.
तसेच महाविकास आघाडीच्या लोकसभेसाठीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये किमान 15 ओबीसी उमेदवारांचा समावेश करावा, आणि वंचित बहुजन आघाडीनं 26 मतदारसंघांची यादी दिली आहे. वंचितनं तयारी सुरू केलेल्या मतदारसंघांची ती यादी आहे.
राज्यातील एकाही मतदारसंघात सध्या वंचित बहुजन आघाडीचा विद्यमान खासदार नाही. मात्र त्यांनी जास्त जागा मागितल्याने आता महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. यावर दोन दिवसात अंतिम निर्णय होणार आहे.