शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांनी वटसावित्रीच्या पुजेबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
यामुळे आता हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे म्हणाले, वारकरी आणि धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचे आहे.
कुत्र्याला लांबचे ऐकायला येतं. वटवाघळाला येतं. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या ७ मतांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत आहे. पुण्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भिडे यांनी पुण्यातील जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतले. भिडे गुरुजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणार आहेत. यावेळी संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना संबोधित केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर तरुण उपस्थित होते.
यावेळी वटपौर्णिमेबाबत त्यांनी हे विधान केले आहे. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. अशा १० -१० हजरांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यात आपल्याला १० हजरांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची आहेत.
आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाला ते हांडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वातंत्र्य आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत. भिडे वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करून अनेकदा ते वादात देखील सापडले आहेत. यामुळे याची चर्चा होत असते.