विधानपरिषद निवडणूकीत भाजपला पुन्हा एकदा धक्का! ठाकरेंनी बाजी मारली, जाणून घ्या संपूर्ण निकाल…

राज्यात लोकसभेला भाजपला आपल्या हक्काच्या जागा जमवाव्या लागल्या होत्या. असे असताना आता मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केले होते. या दोन्ही जागा भाजपला जिंकता आल्या नाहीत. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघातून ठाकरे गटाचे अनिल परब यांच्या विजयाने पदवीधर मतदार संघ ठाकरे गटाने हाती राखला आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघात ठाकरे गटाचे जग्गनाथ अभ्यंकर यांनी हजार 83 मते मिळवून भाजपला पराभूत केले आहे. यामुळे भाजपच्या नेत्यांना धक्का बसला.

कोकण पदवीधरमध्ये भाजपने विजय मिळवला. याठिकाणी निकाल आधीच स्पष्ठ होता. याठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश किर यांच्यात थेट लढत झाली. मुंबई पदवीधर मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाने मारली आहे. तर भाजपचे निरंजन डावखरे यांच्या रुपाने कोकण पदवीधर मतदार संघ आपल्या हाती राखण्यात यश मिळविले आहे.

यामुळे काहीशे यश भाजपला मिळाले आहे. याठिकाणी डावखरे यांना १ लाख ७१९ मते तर काँग्रेसचे किर यांना २८ हजार ६०५ मते पडली. यामुळे डावखरे ७२ हजार ११४ मतांनी विजयी झाले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल 24 तासांपासून सुरुच होती. पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतगणना सध्या सुरु आहे. याठिकाणी नेमकं कोण विजयी होणार हे रात्री उशिरापर्यंत समजले नव्हते.

या पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे आघाडीवर आहेत. यामुळे याठिकाणी त्यांचाच विजय होणार हे नक्की आहे. याबाबत घोषणा देखील झाली आहे. यामुळे ही जागा शिंदे गटाकडे गेल्याचे सांगितले जात आहे.