शिवभक्तांची फसवणूक!! लंडनमधून भारतात येणारी वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत..

आपल्या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा इतिहास आहे. याचा अभ्यास जगभरातील इतिहासकार करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तू आणि गडकोट किल्ल्यांन संदर्भात प्रत्येक शिवभक्ताला मोठ आकर्षण आणि श्रद्धा आहे. यामुळे महाराष्ट्राची ही एक ओळख आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या कोथळा ज्या वाघ नखांनी बाहेर काढला ती वाघ नखे सध्या लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे असल्याचे सांगितले जाते. आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथून भारतात आणली जाणारी वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत.

याबाबत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याशी माझा पत्र व्यवहार झाला आहे. या पत्रात देखील वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा म्युझियम कडून सांगण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता महाराष्ट्र सरकार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवभक्तांची फसवणूक करू नये, असे मत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मांडले आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने ही वाघनखे पुन्हा राज्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

याबाबत तीन वर्षांकरीता भाडेतत्वावर आणण्याचा सामंजस्य करार ३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आला आहे. यामुळे ही वाघ नखे लवकरच महाराष्ट्रात येत आहे. असे सांगितले जाते. वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण म्युझियम पत्राद्वारे कळविले असल्याचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.

यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावरून राज्यात राजकीय वातावरण तापणार आहे. यामुळे या प्रकरणात राज्य सरकार आपला विश्वास घात करत असल्याचे इंद्रजीत सावंत यांनी सांगितले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.