अनेकदा अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलपणाचे किस्से समोर येत असतात. पण उत्तर प्रदेशमधून अशी घटना समोर आली आहे. ज्या घटनेने अधिकाऱ्यांच्या संवेदशनशीलपणाला काळीमा फासला आहे. अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलपणामुळे एका चालकाचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये ही घटना घडली आहे. जीएसटी अधिकाऱ्यांनी एक ट्रक रोखला होता. त्यावेळी चालकाकडे कागदपत्रे अपुर्ण होती. त्यामुळे अधिकारी त्याला जाऊ देत नव्हते. तो अधिकाऱ्यांसमोर रडत रडत जाऊ देण्याची विनंती करत होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
चालकाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. हे त्याला कळल्यानंतर चालक घाईघाईने निघाला होता. त्याला घरी जायचे होते. पण जीएसटी अधिकाऱ्यांनी त्याला काही जाऊ दिले नाही. लेकाचा मृत्यू झाला आहे, मला सोडा, अशा विनवण्या करुनही अधिकाऱ्यांनी त्याला जाऊ दिले नाही.
अशात लेकासाठी रडणाऱ्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. त्या ट्रक चालकाचे नाव बलबीर सिंग असे होते. तो मुळचा पंजाबच्या लुधियानाचा होता. बलबीर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने गंभीर आरोप केले आहे. बलबीर यांची हत्या झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबाकडून केली जात आहे. हत्या झाल्याचा संशय असल्यामुळे ते बलबीर यांच्या पोस्ट मोर्टम रिपोर्टचा अहवाल येण्याची वाट बघताय.
बलबीर यांचा लहान मुलगा महेश हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्यानंतर त्याचा करंट लागून मृत्यू झाल्याचे समोर आले होते. याबाबत बलबीर यांना माहिती देण्यात आली होती. त्यानंतर ते आपल्या मुलासाठी घरी निघाले होते. पण वाटेतच त्यांचा अशाप्रकारे मृत्यू झाला आहे.