घराजवळ ढसाढसा रडत होती चिमुकली; कहाणी ऐकून सगळ्याच गावकऱ्यांनी फोडला टाहो

गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर एका बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये २५ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आता पळासनेरमध्ये एक मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

सिमेंट फॅक्टरीसाठी खडी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता. त्यामुळे ते कंटेनर एका हॉटेलमध्ये घुसले होते. यावेळी कंटेनरने दोन वाहनांना सुद्धा धडक दिली. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७ जण गंभीर जखमी झाले आहे.

ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांचे नातेवाईक यावेळी आक्रोश करताना दिसून आले. अशात एक मुलगी एका घरा्च्या बाहेर हुंदके देत रडताना दिसून आली. पण जेव्हा तिला रडण्याचे कारण विचारण्यात आले तेव्हा तिने जे कारण सांगितले ते खुपच दुखद होते.

ती आपल्या भावाला आणि आईला पळासनेरला सोडायला आली होती. तेव्हा हा अपघात झाला. या अपघातात तिच्या भावाचा मृत्यू झाला आहे. तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे तिने सांगितले आहे.

ही चिमुकली सात वर्षांची असून ती भाऊ आणि आईच तिचा आधार होते. तिच्या वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे भाऊ आणि आईच तिच्यासाठी सर्व होते. पण आता भावाचाही मृत्यू झाला आहे. तर आई नक्की कुठे आहे हे माहित नसल्यामुळे तिच्या डोळ्यातही अश्रू आहे

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता. मध्य रात्री पिंपळखुटा जवळ या बसचा अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर ती बस पलटी झाली होती. त्यानंतर डिझेलची टाकी फुटल्यामुळे त्या बसला आग लागली होती.