वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. त्यांची नेमणूक आणि त्यांचे कुटूंब याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. असे असतानाच पूजा खेडकर प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. पूजा खेडकर यांचे कुटुंबीय फरार झालेत, त्यांचे घर बंद असून फोनही स्विच ऑफ लागत आहे.
याबाबत पोलीस तपास करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून खेडकर कुटुंबीयांशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊन शकलेला नाही, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. खेडकर कुटुंबीयांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यांनी अजून आपली कोणतीही बाजू मांडली नाही.
खेडकर कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलवायचे आहे. मात्र कुटुंबातील कोणाशीच पोलिसांचा संपर्क होत नाही. विविध प्रकरणांची चौकशी आणि तपास करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांना पोलीस संपर्क करत आहेत. याबाबत ते आता फरार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या खेडकर कुटुंब सध्या नेमके कुठे आहे, याची माहिती मिळत नाही. दरम्यान दोन दिवसांपासून या सर्वांचे मोबाईल देखील स्विच ऑफ लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आज पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने खेडकर यांच्या घरी जाऊन बंगल्याचा चित्रीकरण देखील केले.
याबाबत काल देखील पोलिसांचे एक पथक खेडकर यांच्या घरी चौकशीसाठी गेले होते, मात्र कालही कुटुंबातील कोणीही घरात नव्हते त्याचबरोबर बंगल्या बाहेरचे गेट ही बंद असल्यामुळे आत जाऊन तपास करणे पोलिसांना शक्य झालेले नाही. यामुळे पोलीस माघारी आले.
त्यामुळे खेडकर कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून तीन पथकेही तयार करण्यात आल्याची माहिती समोर येते. यामुळे आता त्यांचा तपास लागल्यावर पुढील माहिती समोर येणार आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.